Pimpri : नगरसेविकेशी उद्धटपणे बोलणा-या उद्यान अधीक्षकाला महापौरांनी घेतले फैलावर 

एमपीसी न्यूज – प्रभागातील कामासंदर्भात फोन केला असता पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांनी दाद दिली नाही. तसेच संभाषणादरम्यान उद्धट भाषा वापरली. यामुळे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा कमल घोलप चांगल्याच संतापल्या. त्यांनी थेट महापौरांकडे तक्रार केली. त्यानंतर महारौपारांनी उद्यान अधीक्षक साळुंके यांनी दालनात बोलावून घेत कानउघाडणी केली. तसेच पुन्हा असा प्रकार खपवून घेतला जाणार अशी तंबी दिली.  

कमल घोलप यांच्या प्रभागातील एका कामासंदर्भात त्यांनी उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांच्याशी संपर्क साधला. मात्र, दोन तीन वेळा त्यांनी त्यांना दाद दिली नाही. तसेच संभाषणादरम्यान उद्धट भाषा वापरली. या प्रकाराने घोलप चांगल्याच संतापल्या. त्यांनी महापौर राहूल जाधव यांची आज (मंगळवारी) महापौर दालनात भेट घेतली. साळुंके यांच्या उद्धटपणाची तक्रार केली. दुपारी स्थायी समितीची साप्ताहिक बैठक सुरू असल्याने सुरेश साळुंके त्या बैठकीला उपस्थित होते.

महापौर जाधव यांनी स्वीय सहाय्यकाकडे निरोप पाठवून साळुंके यांना तत्काळ महापौर दालनात उपस्थित राहण्याविषयी आदेश दिला. काही वेळातच सुरेश साळुंके महापौर कक्षात दाखल झाले. त्यानंतर महापौर जाधव यांनी साळुंके यांना चांगलेच फैलावर घेतले. तुमची महापालिकेत किती वर्षे सेवा झाली आहे. महिला नगरसेविकांशी कशाप्रकारे बोलायला हवे, हे देखील तुम्हाला समजत नाही का? अशा शब्दांत त्यांना धारेवर धरले.

यावेळी कमल घोलप यांनी देखील साळुंके यांना त्यांच्या उद्धटपणाचा जाब विचारला. अधिका-यांनी लोकप्रतिनिधींशी अशाप्रकारे उद्धट वर्तन करणे चुकीचे आहे. प्रभागातील काम करण्यासाठी तुम्हाला फोन करुनही उद्धटपणाची भाषा सयोग्य नसल्याचे सुनावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.