Medical Reservation News : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी OBC, EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षण

एमपीसीन्यूज : वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेशांसाठी इतर मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल गट  या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारने आरक्षण मंजूर केले आहे. त्यामुळे  आता MBBS, BDS, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा स्तरावरील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 27 टक्के, तर ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 10 टक्के आरक्षण दिले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. मेडिकल कोर्सेसमध्ये ऑल इंडिया कोटा स्कीम अंतर्गत आरक्षणाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या निर्णयामुळे सुमारे 5550 विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. सरकार मागासवर्गीय आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गांना योग्य आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. दरवर्षी MBBS मध्ये सुमारे 1500 आणि पीजीसाठी सुमारे 2500 ओबीसी विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. याचप्रकारे MBBS मध्ये सुमारे 550 आणि पीजीसाठी 1000 ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

हे आरक्षण अखिल भारतीय कोट्यांतर्गत यूजी आणि पीजी मेडिकल/डेंटल कोर्स (एमबीबीएस/एमडी/एमएस/डिप्लोमा/बीडीएस/MDS)साठी चालू शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून लागू होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.