Mulshi : …जेव्हा प्रवीण तरडे सहकुटुंब भातलावणी करतात

... when Praveen Tarde and his family cultivate paddy शेती विकायची नसते ती राखायची असते' असा संदेश आपल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून देणारे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांची नाळ आजही आपल्या मातीशी जोडली आहे, याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आला.

एमपीसी न्यूज – ‘शेती विकायची नसते ती राखायची असते’ असा संदेश आपल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून देणारे प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांनी मुळशी तालुक्यातील जातेडे या त्यांच्या मूळ गावात वडील विठ्ठल तरडे, आई रुक्मिणी, पत्नी स्नेहल, बंधू योगेश तरडे आणि कुटुंबीयांसमवेत भात लावणी केली. या माध्यमातून त्याचे शेतीवर असलेले प्रेम पाहायला मिळाले.

यावेळी त्यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुनील पालकर यांनीही हातभार लावला. शेती विकायची नसते ती राखायची असते’ असा संदेश आपल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून देणारे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांची नाळ आजही आपल्या मातीशी जोडली आहे, याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आला.

भात लावणी आणि वडील विठ्ठल तरडे यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त फेसबुकद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना प्रवीण तरडे म्हणाले की, सध्या लॉकडाऊनमुळे शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत.

यामुळे मी आपल्या कुटुंबीयांसोबत शेतात भात लावणी करायला आलो आहे. तसेच कोरोनामुळे यंदा वारी झाली नाही यामुळे आई – वडील शेतात राबत आहेत; अन्यथा ते शेतातील कामं आटोपून वारीला निघालेले असतात.

पुण्या – मुंबईत कामासाठी गेलेल्या प्रत्येकाने आपल्या मातीशी असलेले नाते कायम जपावे असे सांगत आपलं शेत आपण कसले पाहिजे असंही ते म्हणाले. तसेच त्यांनी कोरोना, कोविड- 19 आणि लॉकडाऊनच्या काळात शेतकरी ज्या पद्धतीने कष्ट करतो आहे त्याला यावेळी सलाम केला.

मराठीतील भव्यदिव्य असा ऐतिहासिक ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही प्रवीण तरडे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.