Mulshi : मुळशी धरणामधून सकाळी 10 वाजल्यापासून 25 हजार 214 क्युसेक पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज- मुळशी धरण परिसरामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाण्यात वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. या विसर्गामध्ये आज, बुधवारी सकाळी 7 वाजता यामध्ये वाढ करण्यात येऊन तो 10 हजार क्युसेक इतका करण्यात आला. त्यानंतर सकाळी 8 वाजता यामध्ये आणखी वाढ करून 15 हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. आता यामध्ये आज, बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून 25 हजार 214 क्युसेक इतकी वाढ करण्यात येणार आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. दरम्यान, पवना धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.