Pune : पुण्यात मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात

एमपीसी न्यूज- मागील पंधरादिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने काल, मंगळवार मध्यरात्रीपासून पुन्हा जोर धरला आहे. सप्टेंबर महिन्यात मान्सून परतीच्या मार्गावर असतो. पुढील दोन ते तीन दिवस राज्यामध्ये मान्सून सक्रिय राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर मुंबईला पावसाने झोडपले.

मागील 24 तासांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला असून मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये 131 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात पावसाच्या सारी कोसळतील. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पत्ता निर्माण झाल्यामुळे मध्य आणि पूर्वेकडील भागात मान्सून सक्रिय झाला आहे.

पुढील 48 तासात जळगाव, नाशिक, मालेगाव येथे मध्यम तर पुण्यात पावसाच्या हलक्या सारी कोसळतील असा अंदाज आहे. दोन दिवसानंतर पावसाची तीव्रता कमी होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहरात पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.