Mumbai: मुंबईतही करोनाचे आढळले दोन रुग्ण, महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या सातवर!

एमपीसी न्यूज – पुण्यातील पाच जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता मुंबईतील दोन जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे समोर आले आहे. या दोनही रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यातील करोना रुग्णांची संख्या सातवर पोहोचली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

चीनमध्ये हडकंप माजविलेल्या जीवघेण्या कोरोनाने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. दुबईहून आलेल्या पुण्यातील पाच जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. आता पुण्यापाठोपाठ मुंबईतही दोन जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे.

या रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. पुण्यापाठोपाठ मुंबईतही ‘कोरोना’चे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.