Nigdi : जीवनविद्या मिशन तर्फे शुक्रवारी आनंददायी संगीत जीवनविद्या सांगीतिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज- जीवनविद्या मिशन पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने नववर्षानिमित्त ‘आनंददायी संगीत जीवनविद्या’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर हॉल, सेक्टर 24, म्हाळसाकांत विद्यालयामागे निगडी प्राधिकरण येथे शुक्रवारी (दि. 4 ) संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमात कृष्णा जोशी आणि सहकलाकार गीते सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा रसिकांनी जास्तीतजास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड शाखेचे उपाध्यक्ष अमर गावडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.