Cruise Drugs Case : ‘नबाब मलिक हा जावयामुळे वेडा झालेला जगातला पहिला सासरा आहे’: अतुल भातखळकर 

एमपीसी न्यूज – अख्या देशात गाजत असलेलं कॅडिलिया क्रुझ ड्रग प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी धक्कादायक खुलासे केले, यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या ड्रग प्रकरणात सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला तब्बल 26 दिवस जेलची हवा खावी लागली होती. नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भाजपा समीर वानखेडे यांच्या समर्थनात उतरली आहे. 

भाजपचे खासदार अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत ‘नबाब मलिक हा जावयामुळे वेडा झालेला जगातला पहिला सासरा आहे’ अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. त्यापूर्वी देखील ‘नवाब मलिक रोज डोक्यात वारा शिरल्यासारखे बरळत आहेत. हाती पुरावे असतील तर कोर्टात जा की? नाही तर वर्गणी काढून त्यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये तरी दाखल करा’, अशी बोचरी टीका अतुल भातखळकर यांनी मलिकांवर केली आहे.

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. तसेच, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनी मलिकांवर निशाणा साधत खोचक टीका केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.