India Corona Update : गेल्या 24 तासांत 11,903 नवे कोरोना रुग्ण, कालपेक्षा 14.2 टक्के रुग्ण वाढले 

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 903 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 14 हजार 159 बरे कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल झालेल्या रुग्ण वाढीच्या तुलनेत गेल्या 24 तासांत 14.2 टक्के रुग्ण अधिक वाढले आहेत.  

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 43 लाख 08 हजार 140 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 36 लाख 97 हजार 740 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.21 टक्के एवढा झाला आहे.

 

देशात गेल्या 24 तासांत 311 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 59 हजार 191 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. सध्या देशात 1 लाख 51 हजार 209 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या मागील 252 दिवसांतील नीचांकी आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 107 कोटी 29 लाख 66 हजार 31 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 41 लाख 16 हजार 230 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.