Dehuroad News : रेल्वे विभागात नोकरी लावण्याच्या बहाण्याने सहा जणांची 26 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – रेल्वे विभागात नोकरी लावण्याच्या बहाण्याने एकाने सहा जणांना 26 लाखांचा गंडा घातला. तसेच भारतीय रेल्वेच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून सहा जणांची आणि शासनाची फसवणूक केली. हा प्रकार 28 जानेवारी 2020 रे 14 जानेवारी 2021 या कालावधीत देहूरोड येथे घडला.

राहुल धौलपुरीया असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने 2 नोव्हेंबर 2021 रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तसेच सुरेश हनुमंत राव, सचिन प्रकाश तुळे, वैभव तुकाराम भिगवणकर आणि एका महिलेकडून आरोपीने प्रत्येकी पावणे पाच लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादी यांचे वडील हनुमंता दोडप्पा राव यांच्याकडून हात उसने म्हणून वेळोवेळी दोन लाख 25 हजार रुपये घेतले.

सहा जणांकडून आरोपीने तब्बल 26 लाख रुपये घेतले. त्यांना रेल्वे विभागात नोकरी न लावता भारतीय रेल्वेच्या नावाने बनावट कागदपत्रांचा उपयोग करून फिर्यादी आणि शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.