NCP : पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्यांमध्ये राजकीय संघर्ष होणार?

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यातील राजकीय संघर्षानंतर आता अजितदादा आणि रोहित पवार या काका-पुतण्यांमध्ये राजकीय संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. कारण, अजितदादांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात कर्जत-जामखडचे आमदार रोहित पवार यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे भविष्यात पिंपरी-चिंचवडकरांना या दोन काका पुतण्यांमधील राजकीय संघर्ष पहायला मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Chikhali : जाधववाडीत डेंग्यूसदृश्य आजाराने  दोन चिमुकल्यांचा बळी

पिंपरी-चिंचवड शहराकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. सलग पंधरा वर्षे अजित पवार यांनी शहरावर राज्य केले. ‘अजितदादा बोले, प्रशासन डोले’ अशी परिस्थिती होती. त्यामुळे बारामतीनंतर पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते.

पण, 2014 नंतर या बालेकिल्याला तडे जावू लागले. जवळच्या सहका-यांनी अजितदादांची साथ सोडली. भाजपचे कमळ हाती घेतले. परिणामी, महापालिकेतील 15 वर्षांची दादांची एकहाती सत्ता गेली. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पूत्र पार्थचा मावळमधून पराभव झाला. तर, विधानसभेला चिंचवड आणि भोसरीत राष्ट्रवादीला उमेदवार मिळाला नव्हता. घड्याळ चिन्ह हद्दपार झाले होते.

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अजित पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादीचा राज्यपातळीवरील एकही नेता लक्ष्य घालत नव्हता. शहरात येण्यास टाळताना दिसले. कारण, दुस-या नेत्याने लक्ष घातलेले अजितदादांना आवडत नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते लक्ष घालत नव्हते असे सांगितले जाते.

आता अजित पवार पक्षातील समर्थक आमदारांना घेवून शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी पक्षावर दावा देखील सांगितला आहे. त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये राजकीय संघर्ष सुरु असतानाचा आता अजितदादा आणि रोहितदादा या काका पुतण्यांमध्ये पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात राजकीय संघर्ष पहायला मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.