NCP : महिलांचे प्रश्न रिल्स टाकून सुटत नसतात – राेहिणी खडसे

एमपीसी न्यूज –  राज्यातील महिलांचे प्रश्न सोशल मीडियावर रिल्स टाकून सुटू शकत ( NCP) नाहीत. त्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या सारखे लोकांच्या मनातील रिअल स्टार्स बनावे लागते असा टाेला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा राेहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांचे नाव न घेता लगावला.

Junnar : निवृत्त शिक्षक आई-वडिलांना मुलाने मारहाण करत घराबाहेर काढले

खडसे या पिंपरी-चिंचवड शहर दाै-यावर आल्या हाेत्या. त्यावेळी त्या बाेलत हाेते. युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, प्रदेश सरचिटणीस राजन नायर, युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, संदीप चव्हाण, सचिन निंबाळकर, राजेश हरगुडे, विश्रांती पाडाळे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष स्वप्नाली असोले, भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष सारिका हरगुडे, अश्विनी आगळे, पंचशीला आगळे, सुजाता पाटील नाजुका वाल्हे, हनीफ शेख, रेखा मोरे, अलका खंडागळे, प्राची ससाने, संगीता अवधूते, जयश्री झेंडे, जोशना बैध आदी यावेळी उपस्थित होते.

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कसे काम करावे याबाबत मार्गदर्शन करत खडसे पुढे म्हणाल्या, वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराविरोधात विरोधकांना योग्य त्या भाषेत उत्तर देण्यास पुढे मागे बघू नका.  तसेच शरद पवार  यांच्या पन्नास वर्षाच्या कालखंडात महिला सक्षमीकरण धोरणामुळेच आज महाराष्ट्रात महिलांना सन्मानाने वागणूक मिळत असल्याचे देखील यावेळी ( NCP) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.