Junnar : निवृत्त शिक्षक आई-वडिलांना मुलाने मारहाण करत घराबाहेर काढले

एमपीसी न्यूज – निवृत्त शिक्षक आईन-वडिलांना मुलाकडून दारु पिऊन (Junnar) मारहाण करण्यात आली आहे.ही घटना सोमवारी (दि.8) जुन्नर येथे घडली आहे. याप्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय सिताराम देशमुख (वय 79 रा. हिवरे, जुन्नर) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून मुलगा मोहित दत्तात्रय देशमुख याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pimpri : पिंपरीतून मुंबईकडे लाखों मराठा बांधव कूच करणार – सतीश काळे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नी हे दोघेही निवृत्त शिक्षक आहेत. त्यांना मोहीत हा एकुलता एक मुलगा आहे. मात्र मोहितला दारुचे व्यसन आहे, शिवाय तो कोहीही व्यवसाय किंवा धंदा करत नाही. उलट फिर्यादी यांनाच शिवीगाळ करणे, दमदाटी करणे , मारहाण करणे असा त्रास देतो. मी तुमचा कसलाही सांभाळ करू शकत नाही , तुम्ही इथून निघून जा.

इथे राहिलात तर तुमचा एक दिवस घात करेन अशी धमकी देत होता. तसेच त्याने सोमवारी देखील आई- वडिलांना घराबाहेर काढत मारहाण केली व घराचा दरवाजा लावून घेतला. शेवटी आई-वडिलांनी पोलिसांची मदत घेत मुला विरोधात तक्रार दाखल केली असून ओतूर पोलीस पुढील तपास करत (Junnar) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.