New Delhi: देशात नवे 407 रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 8,008 वर, मृतांची संख्या 255 वर

एमपीसी न्यूज – देशात आज (शनिवारी) नवे 407 रुग्ण आढळल्याने भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8,008 झाली आहे.  मृतांची एकूण संख्या 255 वर जाऊन पोहचली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने देशातील लॉकडाऊनची मुदत आणखी किमान दोन आठवड्यांसाठी वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

देशात एकूण 8,008 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 255 जणांचा मृत्यू झाला असून 873 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 6,880 इतकी आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 1,666 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. राजस्थानमध्ये आज नवीन 117 कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने त्या राज्यातील रुग्णांची एकूण संख्या 678 झाली आहे.

राज्यनिहाय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांचा आकडा दिला आहे.

महाराष्ट्र – 1,666 (110)

तमिळनाडू – 969 (10)

दिल्ली – 903 (14)

राजस्थान – 678 (3)

तेलंगणा – 487 (12)

मध्यप्रदेश – 451 (39)

उत्तरप्रदेश – 433 (4)

गुजरात – 432 (19)

आंध्रप्रदेश – 405 (6)

केरळ – 374 (13)

जम्मू काश्मीर – 224 (4)

कर्नाटक – 214 (6)

हरियाणा – 177 (2)

पंजाब – 158 (12)

पश्चिम बंगाल – 116 (5)

बिहार – 61 (1)

ओरिसा – 50 (1)

उत्तराखंड – 35 (0)

हिमाचल प्रदेश – 32 (2)

आसाम – 29 (1)

चंदीगड – 19 (0)

छत्तीसगड – 18 (0)

झारखंड – 17 (1)

लडाख – 15 (0)

अंदमान निकोबार – 11 (0)

गोवा – 7 (0)

पाँडिचेरी – 7 (0)

मणिपूर – 2 (0)

त्रिपुरा – 2 (0)

अरुणाचल प्रदेश – 1 (0)

दादरा नगर हवेली – 1 (0)

मिझोराम – 1 (0)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.