India Corona Update : 24 तासांत 50 हजारांहून कमी रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 6 लाखांच्या खाली 

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असून नव्याने वाढ होणा-या रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्या जवळ स्थिरावली आहे. मागील चोवीस तासांत कमी कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 6 लाखांच्या खाली आली आहे. 

देशात गेल्या चोवीस तासांत देशभरात 48 हजार 698 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 01 लाख 83 हजार 143 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 91 लाख 93 हजार 085 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 64 हजार 818 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या सहा लाखांच्या खाली आली असून, सध्या 5 लाख 95 हजार 565 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 94 हजार 493 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत 1 हजार 183 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.30 टक्के एवढा झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 96.71 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 40 कोटी 18 लाख 11 हजार 892 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 17 लाख 45 हजार 809 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

 

 

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 31 कोटी 50 लाख 55 हजार 926 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात विक्रमी 61 लाख 19 हजार 169 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.