New Delhi: रेल्वेची प्रवासी वाहतूक 14 एप्रिलला मध्यरात्रीपर्यंत बंद

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याच्या निर्णयास रेल्वे मंत्रालयाने 14 एप्रिल 2020 रोजी मध्यरात्री 12 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

देशभरातील रेल्वेची प्रवासी वाहतूक 21 मार्चला मध्यरात्री 12 वाजल्यापासून बंद आहे. ही वाहतूक 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने देखील देशभरातील प्रवासी वाहतूक 14 एप्रिलला मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

रेल्वेची मालवाहतूक सेवा मात्र नियमिपणे सुरू राहील, असे रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.