Nigadi: शहरवासियांसमोर उलगडली मराठ्यांची गौरवगाथा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्व 2019 चा समारोप सुमारे 250 कलावंतांच्या संचाने सादर केलेल्या मराठ्यांची गौरवगाथा या भव्य नाट्यप्रयोगाने झाला.

भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान परिसर, निगडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. सर्व महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधन पर्व साजरे करण्यासाठी महापालिका प्रयत्नशिल आहे. त्यामाध्यमातून महापुरुषांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न होईल, असे महापौर जाधव म्हणाले.

  • पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 ते 400  लढाया जिंकल्या असून आपण त्यांचे मावळे आहोत. देशावर आलेल्या कोणत्याही संकटाचा आपण सर्वांनी एकजुटीने सामना केला पाहिजे तरच आपण खरे मावळे शोभून दिसू असेही ते म्हणाले.

यावेळी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देणारे दिपक काळभोर यांना सन्मानित करण्यात आले.

  • यावेळी मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्या शैलजा मोरे, शर्मिला बाबर, नगरसदस्य विलास मडीगेरी, राजू मिसाळ, अमित गावडे, माजी नगरसदस्य मारुती भापकर, अश्विनी चिखले, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशा राऊत, आशादेवी दुरगुडे, कार्यकारी अभियंता दीपक सुपेकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे, रमेश भोसले, शाहीर प्रकाश ढवळे, योगेश बाबर, शिवजयंती उत्सव समितीचे जीवन बोराडे, नकुल भोईर, सागर तापकीर, प्रविण पाटील, अभिषेक म्हसे, प्रतिक इंगळे, निलेश शिंदे, स्वप्निल शिंदे, दत्ता शिंदे, विनायक जगताप, दादासाहेब पाटील, किरण जंजाळे, अक्षय गोंदील, सतिश काळे, नाना वारे, विपुल भोईर, अजय पाताडे, संतोष कवडे, ज्ञानेश्वर लोभे, प्रीतम पाटील, अतुल वर्षे, सचिन अल्हाट, मंदार भोईर, रोहित जगताप, राजू पवार, गणेश सरकटे आदी मान्यवर व बहुसंख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.