BNR-HDR-TOP-Mobile

Pune : लेखक श्रीधर माडगुळकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – गदिमांचे सुपुत्र श्रीधर माडगुळकर यांचे आज निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. आज पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच दिवसापासून ते आजारी असल्यामुळे त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. साहित्य क्षेत्रात लेखक म्हणून श्रीधर माडगुळकर त्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

पुण्यातील गदिमा प्रतिष्ठान, आणि माडगुळे येथील गजानन विकास प्रतिष्ठानवर ते विश्वस्त म्हणून कार्यरत होते.​

सांगली जिल्हातील माडगूळे या खेडयात गजानन विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करुन त्यांनी कै.ग.दि.माडगूळकर हायस्कूल सुरु केले. सुमारे ८ एकर जागेवर या शाळेच्या इमारतीचे बांधकाम आहे. या शाळेत सुमारे ५०० विद्यार्थी शिकतात. १९७० साली ‘जिप्सी’ मासिकाचे संपादन करुन त्यांनी नवीन लेखकांना संधी दिली. तसेच ‘धरती’ आणि साप्ताहिक ‘मायभूमी’ या नियतकालिकांचा उपसंपादक म्हणून काम केलं.

  • ‘आठी-आठी चौसष्ट’ ही कादंबरी राजकीय कादंबरीत मैलाचा दगड समजली जाते. ‘मंतरलेल्या आठवणी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. तसेच त्यांनी विविध वृत्तपत्रांसाठी लेखन केले. ५ आणि ६ जानेवारी २०१३ रोजी गोवा इथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आठव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

मराठी भाषेतील “जाळं” या पहिल्या साप्ताहिकाची त्यांनी सुरवात केली. गदिमा.कॉम आणि मराठीसृष्टी.कॉम या वेबसाईटचे काम पाहत होते.गदिमांची गाणी आणि आठवणी, थोरली पाती-धाकटी पाती या सारख्या साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केलं. त्यांनी अनेक कायर्क्रमात सहभाग त्यांनी घेतला.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3