BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अभियंता तरुणीकडे व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओची मागणी

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – व्हॉट्‌सअॅपवर मेसेज पाठवून तुझे प्रायव्हेट फोटो माझ्याकडे आहेत, ब्लॉक करु नको, तु जर ब्लॉक केले तर तुझा फोटो मुंबईच्या ग्रुपमध्ये दिसेल अशी धमकी देत एकाने अभियंता तरुणीकडे व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीला ज्या क्रमांकावरुन हा मेसेज पाठवण्यात आला तो क्रमांक परदेशातील असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी एका 24 वर्षीय संगणक अभियंता तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी हिंजवडी मधील एका नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी (दि.21) कंपनीत काम सुरू असताना तरुणीला व्हॉट्सअॅपवर अज्ञात व्यक्तीचा मेसेज आला. तुझे प्रायव्हेट फोटो माझ्याकडे आहेत. मला ब्लॉक करू नको, जर ब्लॉक केले तर तुझे प्रायव्हेट फोटो मुंबईच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर दिसतील, असा मजकूर त्यामध्ये होता.

त्यानंतर या क्रमांकावरुन तरुणीचा मॉर्फ केलेला फोटो देखील पाठविण्यात आला. हा फक्त तुझा आणि माझा करार आहे. माझ्याकडे तुझ्या मित्रांची लिस्ट आहे. तो मी त्यांना वैयक्तिक पाठविणार आहे.

असे नको असेल तर एका मिनिटाचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ मला पाठव. तो मी कोणाला दाखवणार नाही, असा मेसेज आला. तसेच व्हॉटस्‌अॅपवरुन कॉल करुण तरुणीला त्रास दिला. त्यानंतर तु जर पोलिसात गेलीस तर बघून घेईन , अशी धमकीही तिला दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.