Lonavala : विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा सर‍ाव करावा- भानुप्रताप बर्गे

राष्ट्रीय सेवा योजना विभाग‍ाचा लोकजागर

एमपीसी न्यूज- सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा येथे राष्ट्रीय सेवा योजना एकक मार्फत आयोजित लोकजागर अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी पुणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी त्यांचे पोलीस खात्यातील अनुभव, महिलांच्या सुरक्षिततेचे कायदे, दहशतवाद यासोबतच स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी भारती विद्यापीठाचे प्राध्यापक व रेखाचित्रकार गिरीश चरवड, प्राचार्य डॉ.एस.बी.देसाई, डॉ. जयवंत देसाई, वसेकर सर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत बर्गे यांनी पोलीस खात्यामधील वेगवेगळे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. शूटआउट लोखंडवाला, २६/११ बॉम्बस्फोट यासारख्या केसेस मधील पोलिसांचे योगदान त्यांनी सांगितले.

गिरीश चरवड यांनी कलेचा सामाजिक क्षेत्रात उपयोग कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी त्यांच्या पोलीस खात्यामधील योगदानाबद्दल माहिती सांगितली. 1993 पासून अतिरेकी दहशतवादी क्रिमिनल्स यांची रेखाटलेली चित्रे तसेच यातून पकडले गेलेले आरोपी व गुन्हा यावेळी कोणती सुरक्षितता घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी कविता, सरोद, वादन व नक्षीकाम यांचा उपयोग व कला याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी वीर जवान तुझे सलाम अन्न नासाडी व बेरोजगारी या विषयावर सामाजिक नाटिका व दोन सामाजिक नृत्य सादर करत त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संकुल संचालक डॉ. एम. एस.गायकवाड, स्थावर व मालमत्ता अधिकारी पंकज जाधव व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सुमित देवर्षी आणि रासेयो स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.