Pune News : भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचे एनएसएस हिवाळी शिबीर उत्साहात

एमपीसी न्यूज : भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज तर्फे खानापूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. (Pune News) या हिवाळी शिबिरामध्ये विविध समाज उपयोगी आणि ग्रामविकसनाचे उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 32 विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले.

Pune News : फुरसुंगी, उरूळी देवाची गावे वगळण्यास महापालिकेची मंजुरी

यावर्षी गाव डिजिटल साक्षर करण्यावर भर देण्यात आला. भारती विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य  डॉ. उज्वला बेंडाळे यांच्या (Pune News) मार्गदर्शनाखाली हे उपक्रम पार पडले. गावकऱ्यांसाठी आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट काढून देण्यात आले. सायबर गुन्ह्यांबद्दल पथनाट्य सादर करण्यात आले. 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान हे शिबिर पार पडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.