Pune News : ‘भारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तन’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र

एमपीसी न्यूज – पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सिम्बायोसिस विधी महाविद्यालयात ‘भारतातील फौजदारी न्याय प्रणालीमधील परिवर्तन’ यावर ऑनलाईन चर्चासत्र नुकतेच आयोजित करण्यात आले होते. 

डॉ. शशिकला गुरपूर, संचालिका आणि अधिष्ठता, कायदा शाखा सिम्बायोसिस अंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ यांनी स्वागत व विषयांची ओळख करुन दिली. आणि सिम्बायोसिस विधी महाविद्यालयाच्या परंपरेनंतर समाजातील कायदेशीर सुधारणेतील योगदानाबद्दल माहिती दिली. तसेच सदर कार्यक्रमाबद्दल विशेषतः संशोधन आणि फौजदारी प्रक्रियेबद्दल बोलल्या.

डॉ. बिंदू रोनाल्ड, उपसंचालिका , सिम्बॉसिस विधी महाविद्यालय , पुणे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमामध्ये ठराविक विषयानुसार सिम्बायोसिस च्या टीम ने सुचवलेल्या शिफारशींचा आढावा घेण्यात आला आणि प्रत्येक विषयानंतर ऑनलाईन प्रश्नावली पाठवून त्यावरती ऑनलाईन पद्धतीनेच मते घेण्यात आली.

प्राध्यापक लास्या व्याकरणम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

पहिल्या पॅनेलचे सूत्रसंचालन डॉ.शशिकला गुरपुर तसेच डॉ. आत्माराम शेळके, वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक यांनी केले. ‘पोलिस अधिकारी व सरकारी वकील यांच्यात समन्वय ठेवून शिक्षेमधील अपेक्षित वाढ’ या विषयावर पॅनेलवर चर्चा झाली.

यामध्ये विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम, अ‍ॅड. एस.के. जैन, अ‍ॅड. हितेश जैन, निवृत्त पोलीस अधिकारी श्री भानुप्रताप बर्गे आणि महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार रोहित आठवले सहभागी झाले होते.

अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी चर्चेला सुरुवात केली. वैयक्तिक अनुभव सांगत त्यांनी तपास यंत्रणा आणि सरकारी वकील यांच्यात समानव्याचा अभाव असल्याचे सांगितले. अ‍ॅड. हितेश जैन यांनी न्यायमूर्ती मलीमठ समितीचा अहवाल आणि प्रत्येक राज्यात अभियोजन संचालक स्थापन करण्याच्या शिफारशींची गरज असल्याचे नमूद केले.

एटीएसचे माजी अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी फौजदारी खटल्यांच्या चौकशी दरम्यानच्या अडचणींबद्दल माहिती दिली. अ‍ॅड. एस. के. जैन यांनी माध्यमांकडून चालवल्या जाणाऱ्या खटल्यांचे परिणाम आणि ते रोखण्यासाठी खटल्याच्या कारवाईत कशा उपाययोजना कराव्यात, याकडे लक्ष वेधले.

दुसर्‍या पॅनेलचे सूत्रसंचालन संचालिका डॉ.शशिकला गुरपुर आणि शिरीष कुलकर्णी , (सहाय्य्क प्राध्यापक) यांनी केले. ‘साक्षीदारांचे संरक्षण ’ या विषयावर चर्चा केली.

यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसाळकर जोशी, श्री आलोक अग्रवाल (संशोधन व धोरण सल्लागार,) एन.ए.एल.एस.ए., अ‍ॅड. लतीका साळगावकर , डॉ हरीश शेट्टी, (मानसोपचारतज्ज्ञ) अ‍ॅड. हितेश जैन, (मुंबई उच्च न्यायालय); आणि भानुप्रताप बर्गे, (निवृत्त. एटीएस अधिकारी). डॉ. शालिनी जोशी यांनी प्रतिपादन केले की साक्षीदारांना सन्माननीय वागणुकीची गरज आहे.

आलोक अग्रवाल यांनी साक्षीदारांना न्यायालयात येण्याची गरज भासल्यास न्यायालयामध्ये निश्चित वेळ उपलब्ध करुन देण्याची यंत्रणेची शिफारस केली. अ‍ॅड. लतीका साळगावकर यांनी नमूद केले की बहुतेक लोक साक्षीदार होण्यास नकार देतात कारण त्यांना न्यायालयातील त्रास , वेळेचा उपव्यव आणि कदाचित अत्याचाराची भीती वाटते.

डॉ. हरीश शेट्टी यांनी नमूद केले की साक्षीदारांच्या भावनिक आरोग्यास संरक्षण देणे आवश्यक आहे, तसेच साक्षीदारांना संरक्षण आणि प्रोत्सहन मिळेल. भानुप्रताप बर्गे यांनी नमूद केले की साक्षीदारांच्या सुरक्षेची खात्री चे कर्तव्य सरकार व पोलिस यांनी करावे.

अ‍ॅड. हितेश जैन यांनी संरक्षणाच्या अशा तरतुदींच्या बाबतीत समाजात जागरूकता नसणे हे दुर्दैवी आहे असे नमूद केले. म्हणूनच, या साक्षीदारांचे मानवी हक्क सुनिश्चित हेणेसाठी जनजागृतीवर अधिक भर दिला जावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. मॉडेरेशन डॉ. शशिकला गुरपूर यांनीही राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाद्वारे साक्षीदार संरक्षण योजना बद्दल जनजागृती करण्याची आवश्यकता सांगितली.

तिसरे पॅनेलचे सूत्रसंचालन डॉ. शशिकला गुरपुर यांनी केले तर सह-संचालन प्राध्यापक चैत्रIली देशमुख, (पत्रकार) यांनी केली. पॅनेलमध्ये ‘फौजदारी खटल्यातील बळींचे संरक्षण आणि अद्यावत पुनर्वसन ’ या विषयावर चर्चा करण्यात आली.

 त्यात न्यायमूर्ती (निवृत्त ) डॉ. शालिनी फणसाळकर जोशी, डॉ. एस. सी. रैना, (संचालक , के.आय.आय.टी. भुवनेश्वर); अ‍ॅड. एस. के. जैन ; सुनील चौहान, संचालक, एन.ए.एल.एस.ए.; डॉ हरीश शेट्टी, (मानसोपचारतज्ज्ञ); आणि अ‍ॅड. लतिका साळगावकर उपस्थित होते.

नुकसान भरपाईच्या नियमांबाबत कायदेशीर पध्दतीत अधिक जागरूकता निर्माण करावी लागेल, मत फणसाळकर यांनी व्यक्त केले. डॉ. रैना यांनी भारताच्या गुन्हेगारी न्यायालयीन पीडितांचे पुनर्वसन न झाल्याबद्दल तीव्र भावना व्यक्त केली आणि नुकसान भरपाईची योग्य गणना केली पाहिजे असा युक्तिवाद केला.

अ‍ॅड. जैन यांनी सांगितले की प्रत्येक पीडिताच्या नुकसान भरपाईची मोजणी करण्यासाठी वैज्ञानिक मेट्रिकची आवश्यकता असल्याचे सांगितले. सुनील चौहान यांनी कार्यकारी आणि जिल्हा कायदेशीर सेवा यांच्या हाती असलेल्या भरपाईची सद्य प्रक्रिया तसेच पीडितांना भरपाई देण्यास मोठ्या प्रमाणात विलंब कसा होतो याविषयी माहिती दिली आणि प्रक्रियेतील दुरुस्ती सुचविल्या.

अ‍ॅड. लतिका साळगावकर यांनी नुकसान भरपाईच्या भूमिकेवर भर दिला. फक्त पीडितांवर उपाय म्हणून नव्हे तर राज्याचे कर्तव्य बजावण्यास चुकीचे आणि असमर्थ असल्याची खंत व्यक्त केली.

चौथे पॅनेलचे सूत्रसंचालन संचालिका डॉ. शशिकला गुरपूर यांनी केले तर सह-संचालन सहायक प्राध्यापक डॉ. आशिष देशपांडे यांनी केले ‘खटले काढून टाकणेच्या तरतुदींचा गैरवापर’ या विषयावर चर्चा झाली.

यामध्ये अ‍ॅड. एस. के. जैन, नितीन कोंडावले पाटील, आय.आर.एस.; अ‍ॅड. हितेश जैन, डॉ. डी. पी. सिंग, (समाजशास्त्रज्ञ ), टी.आय.एस.एस.; आणि अ‍ॅड. संपत बुलुसु, जनरल मॅनेजर लीगल अँड कॉर्पोरेट अफेयर्स, शेल हजीरा एल.एन.जी. यांनी केले.

नितीन पाटील यांनी जर्मनी, ऑस्ट्रिया आणि इंग्लंडच्या प्रणालींमधून विचारात घेतल्या जाणार्‍या विविध सुधारणांचा उल्लेख करून चर्चेला सुरुवात केली. त्या पाठोपाठ अ‍ॅड. संपत बुलुसु यांनी बरीच उदाहरणे दिली ज्यात गुन्हेगारी न्यायालयीन यंत्रणेला पीडितांच्या हक्कांचा गैरवापर होण्यापासून रोखण्यासाठी कोर्ट आणि कार्यकारिणीचे कर्तव्य स्पष्ट केले.

पाचव्या पॅनेलचे सूत्रसंचालन संचालिका डॉ. शशिकला गुरपुर यांनी केले तर सहसंयोजक अ‍ॅड. संग्रामजीत चव्हाण यांनी केले . ‘सध्याच्या तुरूंगातून सोडण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी , अ‍ॅड. एस.के. जैन, अ‍ॅड. सुनील चौहान, संचालक, एन.ए.एल.एस.ए. अरविंद तिवारी, टी. आय . आय . एस. डॉ. हरीश शेट्टी, (मानसोपचारतज्ज्ञ) आणि अ‍ॅड. संपत बुलुसु, उपस्थित होते.

चव्हाण यांनी चर्चेला सुरुवात केली. फौजदारी न्यायालयातील मुख्य समस्या, सुधारणांचे व पुनर्वसनाचे उद्दीष्टे प्रभावीपणे साध्य करण्यासाठी कारागृहात मोठ्या संख्येने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

डॉ. तिवारी यांनी समाजसेवेची व पुनर्वसनाचा पुन्हा विचार करावा अशी शिफारस केली. उच्चभ्रू किंवा आर्थिक गुन्ह्यांबद्दल बोलताना अनावश्यक अटक टाळण्यासाठी चौहान यांनी पोलीस ठाण्यातच संशयितांना कायदेशीर मदत देण्याची शिफारस केली.

अ‍ॅड. बुलुसू यांनी चर्चेचा निष्कर्ष काढला की, न्यायाधीश सी. आर. पी. सी. चे कलम 258 नुसार अर्ज दिल्यास न्यायालयीन कामकाजामुळे होणारी दिरंगाई आणि अंडर ट्रायल कैद्यांचा प्राथमिक प्रश्न कमी होऊ शकतो असे नमूद केले.

सहाव्या पॅनेलचे सूत्रसंचालन डॉ.शशिकला गुरपूर यांनी केले तर सह-संचालन डॉ आत्माराम शेळके यांनी केले. पॅनेलमध्ये ‘सायबर अँड फॉरेन्सिक’ या विषयावर चर्चा करण्यात आली.

यामध्ये अ‍ॅड. सतीश मानेशिंदे, डॉ. अरविंद तिवारी, भानुप्रताप बर्गे, डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा ( सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञ); आणि अ‍ॅड. हितेश जैन हे सहभागी होते.

डॉ. हॅरल्ड डिकोस्टा यांनी नमूद केले की न्यायालयीन यंत्रणेत सध्या मोठ्या प्रमाणात डिजिटल फॉरेन्सिक घटकांचा समावेश आहे आणि त्याच वेळी सायबर फॉरेन्सिक लॅबची तीव्र कमतरता आहे असे नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.