Bhanupratap Barge : सामाजिक संस्था व पोलीस यांच्यात संवाद हवा – भानुप्रताप बर्गे

एमपीसी न्यूज – सामाजिक संस्था या समस्यांचे निराकरण करणारे केंद्र असल्याने, अनेकदा समस्या या संस्थांकडे आधी येतात आणि नंतर पोलिसांना समजतात. त्यामुळे संस्था आणि पोलीस यांच्यात संवाद होत राहिला, तर समस्या लवकर सुटण्यास मदत होईल, असे मत माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे (Bhanupratap Barge) यांनी व्यक्त केले.

वंचित विकास संस्थेच्या वतीने स्वर्गीय विलास चाफेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त एकदिवसीय सामाजिक परिषदेचे पुण्यात आयोजन केले होते. विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी एकत्रित येत विचारांची व अनुभवांची देवाणघेवाण केली. वंचित विकास’चे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, उपाध्यक्ष तानाजी गायकवाड, कार्यवाह मीनाताई कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, कार्यकारिणी सदस्य डॉ. श्रीकांत गबाले, देवयानी गोंगले व मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते.

Meritorious Ceremony : कै.कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान व आधार महिला मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

पुढे भानुप्रताप बर्गे (Bhanupratap Barge) म्हणाले की, तळागाळातील लोकांपासून ते पंचतारांकित बंगल्यातील लोकांपर्यंत सर्वांशीच आमचा संबंध येतो. त्यांच्या समस्या खूप जवळून पाहतो. आपल्यातील ‘माणूस’ जिवंत ठेवून त्याकडे पाहण्याचे आव्हान असते. कायद्याविषयी, समाजाच्या स्वास्थ्याविषयी जागृती आवश्यक आहे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

ॲड. तानाजी गायकवाड यांनी स्वागत केले. मीनाताई कुर्लेकर प्रास्ताविक केले. डॉ. श्रीकांत गबाले यांनी सूत्रसंचालन केले. मीनाक्षी नवले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.