Meritorious Ceremony : कै.कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान व आधार महिला मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज : आज कै.कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान व आधार महिला मंडळ आयोजित दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शाहूनगर येथे (Meritorious Ceremony) संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.दिगंबर ढोकले सर होते, तर उद्योजक आणि माजी नगरसेवक महेशभाऊ चांदगुडे, माजी उपमहापौर केशव घोळवे, शैलेश वांजरे, संदीप थोरात, संदीप चव्हाण, भगवान मुळे, नवनाथ पवार, ज्येष्ठ नागरिक जाधव काका, कदम काका, वनिता एकनाथ पवार दिपाली कारंजकर तसेच आधार महिला मंडळाच्या सर्व महिला या वेळी उपस्थित होते.

Junnar : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त एक हजाराहून अधिक लाभार्थ्यांना विविध योजनांच्या आदेशाचे वाटप

प्रा.दिगंबर ढोकले सर यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालक यांना उद्याचे भविष्य या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुप्रिया चांदगुडे यांनी केले, तर आभार दिपाली कारंजकर यांनी मानले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन (Meritorious Ceremony) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.