Pune Crime : तीन पीस्टल व तीन काडतुसांसह आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – तीन पिस्टल व तीन जिवंत काडतुसासह आरोपीला अटक करण्यात आली आहे. हि कारवाई पुणे आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा सहाने (Pune Crime) केली आहे.

करवेंद्रसिंग राघवेंद्रसिंग चव्हाण (वय 26 रा.मांजरी, मुळ उत्तरप्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा सहाच्या पथकाला आरोपी संदर्भात बातमीदारामार्फत खबर मिळाली असता पोलिसांनी केसनंद रोड येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून एक पिस्टल व जिवंत काडतूस असा एकूण 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तपासात त्याने घरात लपवून ठेलेले दोन पिस्टल व दोन काडतूसही पोलिसांच्या ताब्यात दिले. असा एकूण 60 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केला. तसेच, त्याच्यावरील लोणाकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हेही यावेळी समोर आले. याचा पुढिल तपास पोलीस करीत (Pune Crime) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.