Anti-Human Trafficking Cell : चिखलीचे संशयित नरबळी प्रकरण हे ‘अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग सेलकडे रवानगी

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चिखलीचे संशयित नरबळी प्रकरण हे ‘अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग सेल’ला (Anti-Human Trafficking Cell) पुढील तपासासाठी दिले आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे काकासाहेब डोळे यांनी चिखली पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

फिर्यादी तारा शेख (वय 30 वर्षे, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांची साडेतीन वर्षाच्या मुलीचे 23 जुलै रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यांना ती दुपारी घराबाहेर दिसली नाही. त्यामुळे त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या अन्वये विमल चौगुले (वय 28 वर्षे) व संतोष चौगुले (वय 41 वर्षे, रा. महादेवनगर, जुन्नर), सुनीता नलावडे  (वय 40 वर्षे), अंकिता नलावडे (वय 22 वर्षे) आणि निकिता नलावडे (वय 18 वर्षे, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) व विधीसंघर्षित बालक (वय 12 वर्षे) यांना अटक करण्यात आले आहे.

चिखलीतील मुलीचे अपहरण हे नरबळीसाठी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्याबाबतीत भोईटे म्हणाले, की “पोलीस सर्व अँगल्सचा तपास करत आहेत. अपहरण हे नरबळीसाठी केल्याचे ठोस पुरावे अजून मिळाले नाहीत. आरोपी चौगुले या महिलेची चौकशी केली असता, ती म्हणाली की तिला मुलगी नाही म्हणून त्या मुलीला पळवून नेले. परंतु, त्यावर आमचा विश्वास नाही. कारण आरोपीच्या बहिणीला 2 मुली आहेत. मग शेजारच्यांची मुलगी का पळवली ते कळत नाही.”

पुढे भोईटे म्हणाले की, ” पोलीस आरोपींवर आधी कोणते गुन्हे दाखल आहेत का? ते तपासत आहेत.”
फिर्यादी तारा शेख या मुळच्या कर्नाटक राज्यातील रहिवासी असून त्यांना एकूण तीन मुली आहेत. त्या त्यांच्या चिखलीतील नातेवाईकांकडे 2 ते 3 महिन्यांपूर्वी राहायला आल्या आहेत. फिर्यादी त्यांचे पती राजा व सर्वात लहान मुलगी येथे ताम्हाणे वस्तीत राहतात. त्यांच्या दोन मुली गावी राहतात. अपहरण झालेल्या मुलीच्या शेजारी सुनीता नलवडे ही तिच्या दोन मुली व मुलगा याच्यासह राहते. तिची जुन्नर येथे राहणारी बहीण विमल चौगुले ही तिच्या विधीसंघर्षित बालक (वय 12 वर्षे) याच्यासह तिच्याकडे राहायला आली होती. त्यावेळी तीने शेजारी राहणाऱ्या मुलीस पाहिले होते. त्या मुलीला पळवून नेण्याच्या उद्देशाने तीला चॉकलेट देणे, खाऊ देणे, मोबाईल खेळण्यासाठी देऊन  तिला लळा लावला होता. त्यामुळे ती मुलगी त्यांच्या घरी येत जात असे.

त्यानंतर (Anti-Human Trafficking Cell) ती तीच्या मुलास बहिणीकडे चिखलीत ठेवून जुन्नरला गेली. ती पती संतोष चौगुले याच्यासह चिखली येथे आली व तीने तीची बहीण सुनीता व तिच्या विधिसंघसर्षित मुलाला फोन करून त्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घराबाहेर टॉवर लाईन परिसरात आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी त्या मुलीस टॉवर लाईन येथें आणल्यावर तेथून तीला कडेवर घेऊन आले.

त्यानंतर पुढे विमल रिक्षामध्ये बसवून रुपीनगरच्या दिशेने घेऊन गेले. त्यानंतर नवऱ्याच्या मदतीने मुलीला जुन्नरला घेऊन गेली. पोलिसांकडे तक्रार प्राप्त होताच, त्यांनी मुलीच्या राहत्या घराचे, टॉवर लाइन परिसरातील घरे व दुकाने यांच्याकडील सीसीटीव्ही फुटेज तपासून, मोबाईल लोकेशन व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीचे जुन्नरमधील घराचे लोकेशन मिळवले. ते जुन्नर पोलिसांना कळवले व त्यांनी मुलीची सुटका केली आणि आरोपिंना ताब्यात घेण्यात आले.

पत्रकार परिषदेत (Anti-Human Trafficking Cell) पोलीस उपआयुक्त परिमंडळ -2 आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले – पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सदस्या नंदिनी जाधव, राज्याचे पदाधिकारी मिलिंद देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीराम नलवडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.