Nigdi : निगडीमध्ये गुरुवारी दिपोत्सव

एमपीसी  न्यूज – दिवंगत महापौर मधुकर पवळे प्रतिष्ठान निगडी यांच्यावतीने सालाबादप्रमाणे दीपावली पाडवा सणानिमित्त भक्ती शक्ती समूहशिल्प निगडी येथे दीपोत्सवाचे आयोजन केले आहे.

हा दिपोत्सव  गुरुवार दि. 8 नोव्हेंबरला सायंकाळी 6.30 वाजता आयोजन केले आहे. यावेळी  आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहूल जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, किरण चोपडा,  स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड  आदी उपस्थित राहणार आहे.  या वेळी 15000 दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहे,कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये विद्युत रोषणाई, उडते आकाशदिवे, फटाक्यांची आतषबाजी, भव्य रांगोळी असणार आहे. दीपोत्सवाचे यंदाचे 17 वे वर्ष आहे. कार्यक्रमाचे संयोजन दत्तात्रय पवळे, सुमनताई पवळे, संतोष कवडे यांनी केले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.