Nigdi : दिलासा साहित्य सेवा संघाच्या वतीने पत्रकार विवेक कुलकर्णी यांचा गौरव

एमपीसी न्यूज – विविध विषयांवर अनेक वर्षापासून लिखाण (Nigdi) करणारे पत्रकार विवेक कुलकर्णी यांचा गौरव दिलासा साहित्य सेवा संघाच्या वतीने कवी आत्माराम हारे यांच्या हस्ते करण्यात आला.

औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड मधील साहित्यिक व पत्रकांरांना (Nigdi)त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल दिलासा साहित्य सेवा संघ आणि या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कंक यांच्या वतीने वेळोवेळी सन्मानित करण्यात येते. त्यानिमित्ताने पत्रकार विवेक कुलकर्णी यांचा सन्मान निगडी येथील त्यांच्या राहत्या घरी कवी आत्माराम हारे यांच्या हस्ते करण्यात आला.

Delhi : 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न

हा सत्कार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात येणार होता. काही कारणास्तव विवेक कुलकर्णी यांना त्या कार्यक्रमास उपस्थित राहणे शक्य नसल्याने हा सन्मान त्यांच्या निगडी येथील निवासस्थानी जाऊन करण्यात आला.

यावेळी आत्माराम हारे म्हणाले, आजच्या पत्रकारितेवर चांगलं भाष्य करायला जीभ रेटत नाही, कारण आरश्यात दिसणारे पत्रकारितेचे रुप वेगळेच आहे. तरी विवेक कुलकर्णी या चांगल्या पत्रकार लेखक असलेल्या व्यक्तींचा सन्मान माझ्या हातून झाला याचा आनंद मला आहे.

‘दिलासा साहित्य सेवा संघाने माझा केलेला हा सन्मान माझ्यासाठी कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नाही,’ अशा भावना शापित गंधर्व या विषयावर सातत्याने गेले वर्षभर लिखाण काम करणारे पत्रकार विवेक कुलकर्णी यांनी सन्मान स्विकारल्या नंतर भावना व्यक्त केल्या. यावेळी विवेक कुलकर्णी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ कुलकर्णी उपस्थित होत्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.