Delhi : 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज -69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात (Delhi) ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, अल्लू अर्जुनला पुष्पा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, गंगूबाई काठियावाडीसाठी आलिया भट्ट आणि मिमीसाठी कृती सेननला संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे.


नवी दिल्लीतील विज्ञान भवनात मंगळवारी 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (Delhi)संपन्न झाला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना चित्रपटातील योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Bhimashankar  : पूजेच्या कारणावरून भीमाशंकर मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये तुफान राडा

यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच रॉकेट्री- द नंबी इफेक्टला या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे.


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा देशातील सर्वात प्रतिष्ठेचा चित्रपट पुरस्कार आहे. याची सुरुवात 1954 मध्ये झाली होती. सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.