Bhimashankar  : पूजेच्या कारणावरून भीमाशंकर मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये तुफान राडा

एमपीसी न्यूज – भीमाशंकर येथील मंदिरात पूजा करणाऱ्या कुटुंबातील दोन (Bhimashankar) गटात पूजेच्या कारणावरून वाद झाला. पूजेला बसलेल्या एका व्यक्तीला पाटावरून उठवत दमदाटी केली आणि त्यानंतर तुंबळ हाणामारी झाली. ही घटना सोमवारी (दि. 16) दुपारी भीमाशंकर मंदिरात घडली.
याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात ( Bhimashankar )आली आहे. शंकर गंगाराम कौदरे (वय 65, रा. खरोशी, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 21 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक्ष यशवंत कौदरे (वय 40, रा. भीमाशंकर, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Mumbai : सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

भीमाशंकर मंदिर गाभारा आणि परिसरात असलेल्या शनि मंदिरात पूजा करण्यावरून पुजाऱ्यांमध्ये पूर्वीपासून वाद आहेत. दरम्यान सोमवारी दुपारी मंदिरात पूजा सुरू असताना तिथे आलेल्या काही जणांनी पूजेला पाटावर बसलेल्या व्यक्तीला दमदाटी करून उठवले. त्यानंतर आपसातील वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र हा वाद वाढला. दोन्ही गटातील पुजाऱ्यांनी एकमेकांना मारहाण केली.
देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे एका वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले, “चालू पूजेच्या कामात अडथळा निर्माण करण्याचे तसेच जाणीवपूर्वक खोडसाळपणा करण्याचे काम केले जात आहे. दोन्ही बाजूचे लोक आमचेच आहेत. सामोपचाराने यावर तोडगा काढाला जाईल. मात्र दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.