Alandi : कोयाळी येथे दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील कोयाळी येथे लावलेल्या दारू(Alandi)  भट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी दोन लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 17) दुपारी करण्यात आली.
याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार,(Alandi )आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना माहिती मिळाली की, कोयाळी येथे एका महिलेने विनापरवाना अवैधरित्या गावठी हातभट्टीसाठी लागणारे रसायन एका खड्ड्यात ठेवले आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.
यात पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीचे पाच हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केले. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.