Matrimony fraud : लग्नाचे आमिष दाखवत व्यावसायिकाला अडीच लाखांना गंडवले

एमपीसी न्यूज : मॅट्रीमोनीअल साईटवरून ओळख, लग्नाचे आमिष दाखवत व दवाखान्याचा बहाना करत  व्यावसायिकाला दोन महिलांनी अडीच लाखांचा गंडा घातला आहे.(Matrimony fraud) यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.15) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणजित पुरुषोत्तम इंगळे (वय 44 रा.निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दोन महिलांन विरोधात फिर्याद दिली आहे.

Photo morphing : महिलेच्या फोटोचे मॉर्फींग करत विनयभंग करणाऱ्या दोन व्हॉटसअप अॅडमिन विरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी महिलेशी मॅट्रीमोनिअल साईटवरून ओळख झाली होती. महिलेने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवले.(Matrimony fraud) पुढे आईच्या उपचारासाठी म्हणून तिच्या मैत्रिणीच्या सहाय्यान फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी बँक खाते व मोबाईलवर ऑनलाईन पेमेंटद्वारे 2 लाख 65 हजार रुपये काढून घेतले. हा सारा प्रकार 9 जून 2022 ते 23 जुलै 2022 या कालावधीत घडला असून फिर्यादी यांनी गुरुवारी याबाबत निगडी पोलिसात तक्रार दिली आहे. निगडी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.