Nigdi : राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे प्रधानमंत्री वडापाव सेंटरद्वारे केंद्र सरकारचा निषेध

एमपीसी न्यूज – दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ असे फसवे आश्वासन देणा-या केंद्र सरकारचा निषेध करीत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘पंतप्रधान बेरोजगार योजना अंतर्गत – प्रधानमंत्री वडापाव सेंटर’ सुरु करून ‘भजीतळो’ आंदोलन करण्यात आले. गुरुवारी (दि. 7 ) प्राधिकरण निगडी येथे लोकमान्य टिळक पुतळा चौकात हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना वाकडकर म्हणाले, ” केंद्र सरकारचे धोरण रोजगार वाढीला आणि उद्योग व्यवसायाला मारक आहे. त्यामुळे मागील चार वर्षात पंचेचाळीस टक्के रोजगारात घट झाली. नोटाबंदीमुळे तर छोटे उद्योग, व्यवसाय देशोधडीला लागले. नवीन रोजगार निर्माण करण्याऐवजी मोदी सरकार सुशिक्षित बेरोजगारांना ‘पकोडे’ तळण्याचा सल्ला देत आहे. नविन उद्योग, व्यवसायांतील कर्ज, अनुदान, शिष्यवृत्ती, शिक्षण क्षेत्रातील अनुदान कमी करुन भांडवलदारांना लाखो कोटींचे कर्ज व अनुदान हे सरकार देत आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ असे फसवे आश्वासन देणा-या सरकारचा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेस तीव्र निषेध करीत आहे” यावेळी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी वडापाव सेंटरवर वडापाव विकले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शरद काळभोर, निलेश पांढारकर, कुणाल थोपटे, योगेश गवळी, हर्षवर्धन भोईर, शेखर काटे, भागवत जवळकर, सुनील गव्हाणे, आलोक गायकवाड, मनोज वीर, सनी डहाळे, सतीश डोईफोडे, शिवराज रणवरे, चैतन्य चौरडिया, अमनजित दिपसिंग कोहली, साईश कोकाटे, श्रीरंग भोसले, प्रतीक नायगावकर, ऋषभ म्हेत्रे, मंगेश बजबळकर, हर्षद म्हेत्रे, हेमंत बडदे, आदित्य आडे, हेमल मूर्ती , आण्णा पिल्ले आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युवकांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.