Pune : सारखं सारखं मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करू नका, आधी पक्ष मजबूत करा; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावले

एमपीसी न्यूज – सारखं सारखं मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करू नका, आधी पक्ष संघटना (Pune ) मजबूत करा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना खडसावले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित युवा मिशन या मेळाव्यात अजित पवार यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

युवा पदाधिकारी असताना 1999 ते 2004 या कालखंडात राज्य पिंजून काढले. त्याचा परिणाम 2004 च्या निवडणुकीत दिसून आला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला. पण, त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद मिळाले नाही. मुख्यमंत्री पद का मिळाले नाही, याच्या जास्त खोलात मी आत्ता जाणार नाही. मात्र आताही जरा दमाने घ्या. सारखे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करू नका, प्रथम पक्ष संघटना मजबूत करा मग मुख्यमंत्री पदाचे पाहू, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना रविवारी सुनावले.

Pimpri : अवघ्या काही सेकंदात दोन लाखांची रोकड पळवली

या मेळाव्यात माजी मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री धनंजय मुंडे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे असल्याचे मत व्यक्त केले. त्यावर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना जरा दमाने घेण्याचा सल्ला दिला. दरम्यान, आपण (Pune ) भाजप बरोबर असलो तरी विचारधारा कायम असल्याचे सांगितले. यापूर्वी कधीही वरिष्ठ नेत्यांचे फोन येत नव्हते. आता विचारणा होत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. यापुढे भावनिक राजकारण चालणार नसल्याचा इशाराही अजित पवार यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.