Nigdi News: पवळे क्रीडांगण क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करा – सचिन चिखले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Nigdi News) प्रभाग क्रमांक 13 निगडी येथील कै. मधुकर पवळे क्रीडांगणाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे हे क्रीडांगण लवकर क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पालिकेकडे केली.

याबाबत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात चिखले यांनी म्हटले आहे, की निगडी यमुनानगर मधील कै. मधुकर पवळे क्रीडांगण हे गेली अनेक दिवस ‘फ’ प्रभाग स्थापत्य यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे या क्रीडांगणाचा विकास पूर्णपणे थांबलेला आहे. क्रीडांगणामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी मोडतोड झाली आहे. सुरक्षारक्षक नाहीत.

Bhosari : भोसरी येथे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन

त्याप्रमाणे भटकी जनावरे व कुत्रे यांचा वावर जास्त आहे. त्यामुळे अनेक क्रीडाप्रेमी नाराज (Nigdi News) झालेले आहेत. त्यामुळे पवळे क्रीडांगणाचा विकास होण्यासाठी हे क्रीडांगण हे लवकरात लवकर क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करावे, अशी मागणी चिखले यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.