Nigdi News :’ IICMR’मध्ये ‘एन्टरप्रिनरशिप : जर्नी ऑफ लर्निंग’ विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान

एमपीसी न्यूज – औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनेजमेंट अँड रिसर्च, निगडी या संस्थेत ‘एन्टरप्रिनरशिप : जर्नी ऑफ लर्निंग’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (दि.24) मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने हा कार्यक्रम पार पडला.

रॅक्वेअर इन्कॉर्परेशनचे इंडिया हेड सुनिल देव यांनी ‘उदयोजकतेच्या पाऊलवाटा’ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी एन्टरप्रिनरशिप इंजिनची संकल्पना मांडली. तसेच, उद्यमी बनण्यासाठी त्यांचा खडतर व प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. तसेच विद्यार्थ्यांना उदयोजक बनण्यासाठी आवश्यक गुण व कौशल्ये विकसित करण्याचा सल्ला दिला.

संस्थेच्या संचालक डॉ. दीपाली सवाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एमसीएच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. स्वाती किरंगे यांनी सूत्रसंचालन केले तर, विभाग प्रमुख रेणू मॅथ्यू यांनी आभार मानले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.