Nigdi News: निगडीतील पुलाला ‘भक्ती-शक्ती’ उड्डाणपुल नाव देणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येत असलेल्या पुलाला ‘जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) उड्डाणपुल असे नाव देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव जानेवारी महिन्याच्या महासभेसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपुल व ग्रेडसेपरेटर बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पामधील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सद्यस्थितीत रोटरी व ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वाकडे आहे. प्रकल्प चालू करण्यापूर्वी प्रकल्पास नाव देण्याच्या दृष्टीने ‘फ’ प्रभाग समितीने 4 जून 2018 रोजी या उड्डाणपुलाचे नाव ‘जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) देण्याचा ठराव मंजुर केला आहे.

तथापि, महापालिका कार्यक्षेत्रातील प्रकल्पांना नाव देण्यापूर्वी महासभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या ठरावाच्या अनुषंगाने उड्डाणपुलाला ‘जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) उड्डाणपुल नाव देण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांनी मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवला आ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.