Nigdi : सोशल मिडियाच्या अतिवापराच्या रावणाचे दहन, ट्रीबुट वादनाने उपस्थितांची मने जिंकली

एमपीसी न्यूज –  निगडी प्राधिकरणातील श्री समर्थ युवक प्रतिष्ठानने ( Nigdi)   विजयादशमीच्या निमित्ताने सोशल मिडियाच्या अतिवापराच्या रावणाचे दहन केले. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विट), यु-ट्युबचा वापर कमी करण्याचे आवाहन यानिमित्ताने केले.

निगडीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव येथे झालेल्या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. केरला स्टाईल ट्रीबुट वादन ऐकून उपस्थित भारावून गेले. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विट), यु-ट्युबचे चित्र टाकत मोठी प्रतिकृती तयार केली होती. त्याचे दहन करण्यात आले.

Pimpri : संदीप वाघेरे यांच्या वतीने रावण दहनाचा नेत्रदिपक सोहळा, गर्दीचा उच्चांक

श्री समर्थ युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, आयोजक अमित गावडे म्हणाले, सोशल मीडिया हा आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. परंतु, त्याचा अतिवापर हा हानिकारक आहे.

कामाव्यतिरिक्त तासन तास लोक मोबाईल, लॅपटॉपच्या स्क्रीन समोर बसतात. लहान मुले, विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल फोन दिला जातो. त्याचे दुष्परिणाम अनेक आहेत.

लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांचा स्क्रिनिंगचा वेळ वाढला आहे. त्यामुळे अनेकांच्या चष्म्याचा नंबर वाढला. तरीही आपण सोशल मीडियाचा वापर कमी करत नाही.

सोशल मीडिया जितका फायदेशीर आहे, तितकाच घातक आहे. ड्रीम 11 सारख्या गेम (जुगारा), रमी सारख्या खेळाकडे मुले ओढले जात आहेत. यामुळे मैदानी खेळ खेळणे कमी झाले आहे.

मुलांना पारंपरिक खेळाची माहिती होत नाही. मोबाईलवरच खेळत बसल्याने मुले बाहेर पडत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील समाजात वावरण्याची भीती जात नाही. अनेक मुले अभ्यासात हुशार होतात, पण सामाजिक जाण, समाजभान राहत नाही. समाजात, इतर मुलांमध्ये वावरण्यास घाबरतात.

त्यामुळे सोशल मीडियाचा अतिवापर टाळावा यासाठी यासाठीच यंदा वेगळी संकल्पना घेत सोशल मीडियाच्या अतिवापराच्या रावणाचे दहन केले.  सोशल मीडियाचा अतिवापर टाळण्याचे आवाहन गावडे यांनी उपस्थितांना केले.  यावेळी माजी उपमहापौर राजू मिसाळ उपस्थित ( Nigdi)  होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.