Nigdi : शिक्षण प्रसारक मंडळी निगडी शाळेचा रौप्य महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेच्या यमुनानगर, निगडी येथील शाळेचा रौप्य महोत्सवी सोहळा (Nigdi) शनिवारी (दि. 1) उत्साहात साजरा झाला.

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर कलात्मक व माहितीपूर्ण प्रकल्पांचे प्रदर्शन भरवले. हे प्रदर्शन व नूतन वास्तू पाहण्यासाठी परिसरातील मान्यवर व हितचिंतक तसेच पालक यांनी हजारोंच्या संख्येने भेट दिली.

Maval : कुंडमळा येथे पोलिसांकडून सूचना फलकांचे अनावरण

25 वर्षांपूर्वी 7 विद्यार्थ्यांनी सुरू झालेल्या शाळेत आज विद्यार्थी संख्या अडीच हजारच्या वर आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ प्रवीणजी दबडघाव उपस्थित होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सोहनलाल जैन, उपाध्यक्ष गजेंद्र पवार व नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे तसेच शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, शाला समिती सदस्य पराग ठाकूर, सुधीर काळकर, संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

रौप्य महोत्सवाचे प्रतीक असलेल्या लोगोचे अनावरण यावेळी करण्यात आले. तसेच रौप्य महोत्सवी वर्षाचा ध्वज फडकवण्यात आला. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आणि शाळेला शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुणे दबडघाव यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार करावेत आणि भावी पिढी व समाज सुसंस्कृत बनवावा असे आवाहन सर्व शिक्षक व पालक वर्गाला केले. याप्रसंगी शाळेच्या पहिल्या दिवसापासून शाळेच्या सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षक वृंदांचा व कर्मचारी वर्ग यांचा सत्कार करण्यात आला.

शाळा स्थापनेपासून कार्यरत असणाऱ्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, उमा घोळे यांनी अहवाल वाचन व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मोनिका बोरसे यांनी केले. मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन शाळा समितीचे अध्यक्ष दामोदर भंडारी यांनी केले.

शाळेचे इंग्रजी व मराठी माध्यमाचे सर्व मुख्याध्यापक ज्योती बक्षी, लीना वर्तक, रविंद्र मुंगसे, सविता बिराजदार आणि उमा घोळे तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी (Nigdi) यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.