Nigdi : दुकानाचे शटर उचकटून दीड लाखांची रोकड लंपास

पोलिसांनी एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. : The shutters of the shop were lifted and Rs. one and Half lakh stolen

एमपीसी न्यूज – आकुर्डी स्टेशन चौकातील एका दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दुकानातून एक लाख 40 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 19) पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली.

मेधा उमेश गोखले (वय 47, रा. निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोखले यांचे आकुर्डी स्टेशन चौकाजवळ फास्टट्रॅक शॉप नावाचे दुकान आहे. बुधवारी रात्री गोखले यांनी त्यांचे दुकान कुलूप लाऊन बंद केले. गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास एक अनोळखी चोरटा तोंडाला मास्क, हातामध्ये ग्लोज घालून आला.

त्याने दुकानाचे शटर उचकटले आणि दुकानातून दोन हजार, 500, 200, 100 आणि 50 रुपयाच्या नोटा अशी एकूण एक लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार दुकाना बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.