Odisha Train Accident : हार न मानता वडिलांनी मुलाला शोधलं…आणि शेवटी शवागरात जिवंत सापडला मुलगा

एमपीसी न्यूज- ओडिशामधील बालासोरमध्ये झालेल्या (Odisha Train Accident) भीषण रेल्वे अपघातामध्ये दोनशेहून अधिक मृत्यू तर एक हजाराहून अधिक जण जखमी झाले आहेत.  अपघातानंतर ट्रेनच्या प्रवाशांचे नातलग आपल्या माणसाला शोधत होते. हावडाचे एक दुकानदार हेलाराम मलिक आपल्या मुलाला शोधण्यासाठी घरातून तडक निघाले, पण मुलाच्या शोधासाठी त्यांना शवागरही पहावे लागले.

कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघाताच्या दिवशी हेलाराम यांनी त्यांचा मुलगा विश्वजीत याला शालीमार स्थानकात गाडीत बसविले होते. त्यानंतर गाडीचा अपघात झाल्याची ती वाईट बातमी धडकली. त्यानंतर त्यांनी मुलाला फोन केला तर मुलाची खुशाली कळली पण जखमा भरपूर असल्याने तो बोलण्याच्या स्थितीत नव्हता.

मुलगा जीवंत आहे या बातमीने हेलाराम यांनी एका क्षणाचाही विलंब न करता एका स्थानिक एम्ब्युलन्स ड्रायव्हरला राजी केले. हेलाराम यांनी त्यांचा मेहुणा दीपक दास याला सोबत घेत त्याच रात्री प्रवास सुरु केला. हेलाराम त्याच रात्री 230 किमीचा प्रवास करीत बालासोरला पोहचले. परंतू सर्व हॉस्पिटल्स शोधूनही त्यांचा विश्वजीत काही सापडला नाही.

Monsoon : मान्सून पाऊस लांबणीवर ..’या’ तारखेला दाखल होण्याची शक्यता….

हेलारामचे मेहुणे दीपक दास यांनी सांगितले की आम्ही हिंमत हरली नाही. आम्ही लोकांकडे चौकशी करीत राहीलो. एका व्यक्तीने सल्ला दिला जर मुलगा हॉस्पिटलमध्ये सापडत नाही तर शवागरात एकदा चौकशी करा.  आम्ही काळजावर दगड ठेवून तेथे निघाल्याचे दास यांनी सांगितले.

तेथे हेलाराम मलिक यांना स्वत: जाऊन मृतदेहांची ओळख पटविण्याची परवानगी दिली नाही. परंतू काही वेळाने  तेथे जेव्हा कोणी तरी एका व्यक्तीचा उजवा हात हलताना दिसला असे सांगत आले ,तेव्हा गोंधळ उडाला. तेव्हा मलिक तेथेच होते. त्यांनी पाहीले की तो  विश्वजीतच होता. बेशुध्द अवस्थेत तो होता. तो खुपच जखमी झाला होता.

त्यांनी त्याला एम्ब्युलन्सने बालासोरच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तेथे त्याला काही इंजेक्शन्स दिली गेली. त्याची स्थिती पाहून त्याला कटक येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यास डॉक्टरांनी सांगितले, परंतू बॉंडवर सही करून  त्यांनी त्याचा डिस्चार्ज घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विश्वजीतवर कोलकाता येथील रुग्णालयात सर्जरी केली गेली.आता त्याची प्रकृती (Odisha Train Accident) स्थिर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.