Monsoon : मान्सून पाऊस लांबणीवर ..’या’ तारखेला दाखल होण्याची शक्यता….

एमपीसी न्यूज-  केरळमध्ये 4  जूनच्या आसपास दाखल होणाऱ्या मान्सून पावसाने (Monsoon) हुलकावणी दिली आहे. अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्याची म्हणजे मान्सूनची चाल मंदावली आहे. 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून भारतात कधी दाखल होईल, याबाबत अद्याप स्थिती स्पष्ट नसल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.

Moshi : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व जनजागृती

हवामान खात्याच्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रावरील पश्चिमेकडील वाऱ्यांच्या वाढीमुळे परिस्थिती अनुकूल होत आहे. तसेच, पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली सरासरी समुद्रसपाटीपासून 2.1 किलोमिटरपर्यंत पोहोचली आहे. आग्नेय अरबी समुद्रावरील ढगांचे प्रमाणही वाढत आहे. पुढील तीन ते चार दिवसांत केरळमध्ये मोसमी पाऊस सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती असेल.

त्यामुळे केरळमध्ये 7 ते 8 जूनपर्यंत मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.तर महाराष्ट्रात साधारणपणे 13 ते 15जून दरम्यान पाऊस सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तसेच येत्या दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वळीवाचा  पाऊस (Monsoon) कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.