Maharashtra : राज्याला पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा

एमपीसी न्यूज – मान्सून चांगलाच सक्रिय झाला असून राज्याला पुढील 48 तास मुसळधार (Maharashtra) ते अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे.हे कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेला सरकत आहे. परिणामी पुढील दोन दिवस राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Pune : 14 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित , महावितरणची धडक कारवाई

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम (Maharashtra) असल्याने किनारपट्टीवर ही पावसाचा जोर कायम राहणार आहे.

पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट –

हवामान विभागाने रत्नागिरी, गडचिरोली, चंद्रपूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसराला रेड अलर्ट दिला आहे. किनारपट्टीवरील अन्य जिल्हे, मध्य महाराष्ट्रात ही मुसळधार पावसाचा अंदाज असून, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

त्यामुळे महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहान प्रशासनाने केले (Maharashtra) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.