Pune : 14 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित , महावितरणची धडक कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे परिमंडलातील 7 लाख 8 हजार 892 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक विजग्राहकांकडे 204 कोटी 67 लाख रुपयांची थकबाकी ( Pune ) आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत विजबिलांचा भरणा केला नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरु आहे. यामध्ये गेल्या पंधरवड्यात पुणे परिमंडलातील 14 हजार 155 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Pune : पुणेकरांसाठी खूशखबर …खडकवासला धरण 96 टक्के भरले

विजग्राहकांना चालू व थकीत विजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत विजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 29) व रविवारी (दि. 30) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे.

सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

Pimpri : नेहरूनगरमध्ये मेडिकल दुकानाला आग

सद्यस्थितीत पुणे शहरात एकूण 3 लाख 14 हजार 920 वीजग्राहकांकडे 76 कोटी 11 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ( Pune ) घरगुती 2 लाख 68 हजार 122 ग्राहकांकडे 53 कोटी 91 लाख रुपये, वाणिज्यिक 43 हजार 638 ग्राहकांकडे 20 कोटी 9 लाख रुपये, औद्योगिक 3 हजार 160 ग्राहकांकडे 2 कोटी 12 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 8 हजार 914 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

तर पिंपरी चिंचवड शहरात एकूण 1 लाख 51 हजार 409 वीजग्राहकांकडे 54 कोटी 29 लाख रुपयांची थकबाकी आहे.

यामध्ये घरगुती 1 लाख 25 हजार 869 ग्राहकांकडे 31 कोटी 63 लाख रुपये, वाणिज्यिक 21 हजार 35 ग्राहकांकडे 13 कोटी 4 लाख रुपये, औद्योगिक 4 हजार 505 ग्राहकांकडे 9 कोटी 61 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर 952 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

विजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.