Pune : पुणेकरांसाठी खूशखबर …खडकवासला धरण 96 टक्के भरले

एमपीसी न्यूज – पुणेकरांसाठी खूशखबर …पुणेकरांची पाणी कपातीची चिंता (Pune) मिटण्याच्या मार्गावर आहे.   पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव, पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात संततधार पाऊस सुरू आहे.

Pimpri : नेहरूनगरमध्ये मेडिकल दुकानाला आग

त्यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत 68.50 टक्के,तर 19.97 टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे.

तर चार धरणापैकी खडकवासला धरण हे 96.17 टक्के भरले आहे. तर गतवर्षी आजच्या तारखेला 68.50 टक्के,तर 19.97 टीएमसी इतका (Pune) पाणी साठा जमा होता.

धरण             आजच पाऊस   टीएमसी   टक्के
खडकवासला      5 मिमी          1.90   96.17
पानशेत              23 मिमी        7.80   73.25

वरसगाव             23 मिमी        8.45   65.89
टेमघर                 35 मिमी        1.82   49.22

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.