Pune : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज-लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांपासून (Pune) शारीरीक संबंध निर्माण केले. लग्नाचा बहाणा करुन तरुणीकडून 1 लाख रुपये देखील घेतले. पण, तिच्याशी लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी साखरपुडा उरकून घेतला. तरुणी जाब विचारण्यास गेल्यानंतर त्याच्या घरच्यांनी मुलाचा नाद सोडून दे ,असे म्हणत प्रकरण नाही मिटवले तर धडा शिकवू, अशी धमकीही दिली.

याप्रकरणी एका 23 वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुभम पायगुडे, रोहित पायगुडे, अनिल पायगुडे, , बाळासाहेब पायगुडे (सर्व रा. आगळंब, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Odisha Train Accident : हार न मानता वडिलांनी मुलाला शोधलं…आणि शेवटी शवागरात जिवंत सापडला मुलगा

हा प्रकार जुलै 2019 पासून सुरु होता. चार वर्षांपुर्वी त्यांच्या ओळख झाली होती. ओळखीनंतर त्याने लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. नंतर  दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केला. दरम्यान, शुभमच्या भावानेच तरुणीला शुभमशी लग्न करायचे असेल तर 5 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

त्यानंतर तरुणी शुभमच्या घरी गेली व प्रेमसंबंधाची माहिती दिली असता शुभमच्या भावाने शिवीगाळ करून मारहाण केली .     पुढील तपास पोलीस करत (Pune) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.