Pune : ऑनलाईन पद्धतीने 565 कोटी रुपयांचे विजबील भरत पुणेकर राज्यात प्रथम

एमपीसी न्यूज – महावितरणच्या पुणे परिमंडलातील (Pune) वीज ग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये राज्यात आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या मे महिन्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिकसह इतर 20 लाख 15 हजार लघुदाब वीजग्राहकांनी रांगेत उभे न राहता व सुरक्षितपणे 564 कोटी 99 लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’द्वारे भरणा केला आहे.

पुणे परिमंडलामध्ये जानेवारी ते मे 2023 पर्यंत सरासरी दरमहा ग्राहकांची संख्या 20 लाख 21 हजार 130 वर गेली आहे. ‘ऑनलाइन’ बिल भरण्यास पुणे परिमंडलामध्ये वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि दरमहा सरासरी 1 लाख 56 हजार 330 वीजग्राहकांची गेल्या 5 महिन्यांमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या मे महिन्यात पुणे शहरातील 11 लाख 30 हजार 225 लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी 312 कोटी 87 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये मे महिन्यात लघुदाब 5 लाख 28 हजार 64 ग्राहकांनी 149 कोटी 10 लाखांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. पुणे परिमंडलामध्ये ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात पिंपरी चिंचवड शहर आघाडीवर आहे.

Pune : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

महावितरणकडून प्रामुख्याने बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व 24 तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅप उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीज जोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीज जोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईल मध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे.

लघुदाब वीज ग्राहकांनी क्रेडिट/डेबीट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेटदवारे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा बिल भरणा आता नि:शुल्क आहे. विशेष म्हणजे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच संबंधीत ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच (Pune) देण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.