Pune : ट्री-मॅन विष्णू लांबा यांच्याकडून पर्यावरण दिनानिमित्त तळजाई वनक्षेत्रात वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – श्री कल्पतरू संस्थानच्या वतीने (Pune) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळजाई वनक्षेत्रात ट्री-मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांच्या हस्ते सोमवारी (दि.5) वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी कल्पतरू संस्थानच्या समन्वयिका उमा व्यास, रेश्मा पालवे, भागाबाई चोले आदी उपस्थित होते.

वयाच्या सातव्या वर्षांपासून झाड लावण्यास सुरुवात केली. पर्यावरण संवर्धनासाठी झपाटून काम करताना यंदा वृक्षारोपणाच्या या कार्याला 30 वर्षे पूर्ण होत असून, गेल्या 30 वर्षांत एक कोटी झाडे लावल्याचे समाधान आहे. 2047 पर्यंत भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होताना पाच कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट्य आहे, अशी भावना ट्री-मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांनी व्यक्त केली.

Pune : ऑनलाईन पद्धतीने 565 कोटी रुपयांचे विजबील भरत पुणेकर राज्यात प्रथम

राजीव गांधी पर्यावरण पुरस्कार, डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय निर्माण पुरस्कार, अमृता देवी विश्नोई पुरस्कार, ग्रीन आयडल अवार्ड असे एकूण 150 पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना आजवर मिळाले आहे. त्यांच्या या कार्याची दखल विश्वस्तरावर घेतली गेली आहे. संयुक्त राष्ट्राचे संचालक एरिक सोलहेम यांनी अनेकदा ट्विट करून या कार्याचा गौरव केला आहे. आज 13 देशांत भारताच्या 22 राज्यांत संस्थेचे निःस्वार्थी कार्य सुरू असून, साडेसात लाख स्वयंसेवक सेवा देत आहेत. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय हे कार्य सुरु आहे, हे ही विशेष. यासोबतच पक्ष्यांसाठी घरटे व पाण्याचे पॉट वितरित करण्याचेही काम (Pune) संस्थेद्वारे सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.