Alandi : कार्तिकी एकादशी व संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आळंदी येथे भाविकांसाठी पीएमपीएमएलतर्फे ज्यादा बसचे नियोजन

एमपीसी न्यूज – कार्तिकी एकादशी (Alandi) व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आळंदी यात्रेसाठी बुधवार (दि.6) ते मंगळवारी (दि.12) या कालावधीत करिता मार्गावरील 113 नियमीत बस व जादा 229 सर्व मिळून 342 बसेस धावणार आहेत.

याबरोबरच भाविकांची गरज पाहता शुक्रवारी (दि.8) ते सोमवार (दि.11) या चार दिवसाच्या कालावधीत रात्री देखील बससेवा गरजेनुसार सुरु ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरीत करून काटेवस्ती येथून बसेसचे संचलन करण्यात येत आहे.

बस संचलनाचा तपशील खालील प्रमाणे –

1) स्वारगेट ते आळंदी – दि.8 ते 11 डिसेंबर रात्रीची बससेवा तर 6, 7 व 12 डिसेंबर या कालावधीत रात्री 12 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध असणार आहे.

2) हडपसर ते आळंदी – दि.8 ते 11 डिसेंबर रात्रीची बससेवा तर 6, 7 व 12 डिसेंबर या कालावधीत रात्री 12 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध असणार आहे.

3) पुणे स्टेशन ते आळंदी – दि.8 ते 11 डिसेंबर रात्रीची बससेवा तर 6, 7 व 12 डिसेंबर या कालावधीत रात्री 12 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध असणार आहे.

4) पुणे स्टेशन ते आळंदी – दि.8 ते 11 डिसेंबर रात्रीची बससेवा तर 6, 7 व 12 डिसेंबर या कालावधीत रात्री 12 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध असणार आहे.

5) म.न.पा. भवन ते आळंदी – दि.8 ते 11 डिसेंबर रात्रीची बससेवा तर 6, 7 व 12 डिसेंबर या कालावधीत रात्री 12 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध असणार आहे.

6) निगडी ते आळंदी – दि.8 ते 11 डिसेंबर रात्रीची बससेवा तर 6, 7 व 12 डिसेंबर या कालावधीत रात्री 12 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध असणार आहे.

7) पिंपरी ते आळंदी – दि.8 ते 11 डिसेंबर रात्रीची बससेवा तर 6, 7 व 12 डिसेंबर या कालावधीत रात्री 12 वाजेपर्यंत बससेवा (Alandi) उपलब्ध असणार आहे.

8) चिंचवड ते आळंदी – दि.8 ते 11 डिसेंबर रात्रीची बससेवा तर 6, 7 व 12 डिसेंबर या कालावधीत रात्री 12 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध असणार आहे.

9) देहूगांव ते आळंदी – दि.8 ते 11 डिसेंबर रात्रीची बससेवा तर 6, 7 व 12 डिसेंबर या कालावधीत रात्री 12 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध असणार आहे.

10) भोसरी ते आळंदी – दि.8 ते 11 डिसेंबर रात्रीची बससेवा तर 6, 7 व 12 डिसेंबर या कालावधीत रात्री 12 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध असणार आहे.

11) रहाटणी ते आळंदी – दि.8 ते 11 डिसेंबर रात्रीची बससेवा तर 6, 7 व 12 डिसेंबर या कालावधीत रात्री 12 वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध असणार आहे.

यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या जादा बससेवेसाठी रात्री दहानंतर (नेहमीची बससेवा संपल्यानंतर) सध्याच्या तिकिट दरा पेक्षा 5 रूपये जादा तिकिट दर आकारणी करण्यात येणार आहे. तसेच, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, जेष्ठ नागरिक व इतर पासधारकांना यात्रा कालावधीत रात्री 10 नंतर जादा बससेवेसाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही.

शहरातील बसमार्गावरील संचलनात असलेल्या बसेसमधूनच काही बसेस कमी करून यात्रा स्पेशल बससेवा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आळंदी मार्गावरील मार्ग क्रमांक 264 भोसरी ते पाबळ व मार्ग क्र. 257 आळंदी ते मरकळ हे मार्ग यात्रेच्या काळात संपूर्णतः बंद राहणार आहेत. तरी नागरिकांनी वरील बांबींची नोंद घेत बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.