Dehu road news: फ्लॅट देण्यासाठी साठी 6 लाख रुपये घेऊन फ्लॅट न दिल्याने व रक्कम परत न केल्याने विचारल्यावर शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली

एमपीसी न्युज : फ्लॅट देण्यासाठी साठी 6 लाख रुपये घेऊन फ्लॅट न दिल्याने व रक्कम परत न केल्याने विचारल्यावर शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना देहू येथे घडली आहे.
याबाबत पीडित रघुनाथ कुंभार, वय 65 वर्षे, रा. देहूगाव यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अनिल सरोदे, रा. पंचशील नगर, धनकवडी व भारत पवार रा. इंदिरानगर धनकवडी या आरोपींच्या विरोधात भा.द.वि कलम 406, 420, 504, 506 व 34 अन्वये देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपींनी फिर्यादी यांना देतो म्हणून फिर्यादी कडून काम चालू होण्या अगोदरच 6 लाख रुपये उकळले. त्या फ्लॅट व पैशांबाबत विचारणा केली असता फिर्यादीला उडवा उडवीची उत्तरे देऊन त्यांच्या पैशांचा अपहार करून फिर्यादीची एकूण 6 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत फिर्यादी यांनी आरोपींच्या घरी जाऊन पैशांबाबत विचारणा केली असता त्यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला वाईट वाईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.